

नवी दिल्ली : भारताचं ऐतिहासिक जुनं संसद भवन आता 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याचबरोबर या भवनात वापरण्यात येणाऱ्या काही संज्ञा देखील नव्या संसद भवनात वापरण्यात येणार आहेत, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी केली. (Old Parliament House renamed as Samvidhan Sadan announced Lok Sabha Speaker Om Birla)
बिर्ला म्हणाले, "सकाळी आपण ज्या भवनात जमलो होतो ते आता संविधान सदन म्हणून ओळखलं जाईल. त्याचबरोबर लोकसभेच्या कामकाजात वापरले जाणारे हाऊस, लॉबी आणि गॅलरीज हे शब्दही यापुढे नव्या भवनात जी भारताची संसद आहे, तिथं वापरले जातील" (Latest Marathi News)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी जुन्या संसद भवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये भाषण करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, दोन्ही सभागृहातील विरोधीपक्ष नेते यांना सूचना केली होती. (Marathi Tajya Batmya)
मोदी म्हणाले होते, "जर तुमची सर्वांची संमती असेल तर आपण नव्या संसद भवनात दाखल होताना जुन्या संसदेचं पावित्र्य कमी होता कामा नये, यासाठी जिथं संविधान सभेनं मोलाचं काम केलं त्या जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जावं"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.