Mayawati : मायावती यांना विरोधी गटाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार घोषित करा; बड्या नेत्याची मागणी

Mayawati and narendra modi
Mayawati and narendra modi

नवी दिल्ली - सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांनी मोठं विधान केलं आहे. राजभर म्हणाले की, बहुजन समाज पार्टीच्या (BSP) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती (Mayawati) यांना विरोधी गटाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार घोषित करायला हवं.

Mayawati and narendra modi
Pune Bypoll Election: लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग...पुण्याच्या पोटनिवडणुकीवरुन अजित पवार संतापले

राजभर म्हणाले की, भारतात सामान्य वर्ग आणि मागासवर्गीयांचे पंतप्रधान झाले आहेत, पण एकही दलित पंतप्रधान झाला नाही. राजभर यांनी आपले माजी सहकारी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गुप्तपणे भाजपला मदत केल्याचा आरोप केला. बसपा, काँग्रेस किंवा सुभासपा सारख्या पक्षांसोबत दुसरी आघाडी का स्थापन करत नाही, असा सवाल केला.

गाझीपूर जिल्ह्यातील जहूराबादचे आमदार ओ. पी. राजभर यांनी गुरुवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, "सामान्य प्रवर्गातील लोक आणि आता मागास समाजातील व्यक्ती पंतप्रधान पदावर आहे. मग विरोधक दलित चेहरा का पुढे करत नाहीत? दलित समाजाला कधीच पंतप्रधानपद मिळाले नाही. मायावतींपेक्षा मोठा दलित चेहरा नाही. त्यांनी एकतर नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे किंवा त्यांची दुसरी आघाडी स्थापन करावी. "

Mayawati and narendra modi
Ajit Pawar Statement: नरेश म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले असल्या आलतू फालतू...

विरोधी पक्षनेत्यांना भेटण्यास मायावतींनी नकार दिल्याबद्दल आणि एकट्याने निवडणूक लढवण्याच्या आग्रहाबाबत विचारले असता ओ. पी. राजभर म्हणाले, 'या सर्वांनी मायावतींकडे जाऊन सांगावे की आम्हाला तुम्ही पंतप्रधानपदाच्या उमेदवार हव्या आहात. इतर पक्षाचे नेते हा प्रस्ताव घेऊन गेले तर कोणता नेता नाही म्हणणार? विरोधी पक्षनेत्यांकडून हा प्रस्ताव का मांडला जात नाही?, अशा प्रश्नही राजभर यांनी उपस्थित केला.

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) घाबरून अखिलेश मागच्या दाराने भाजपला मदत करत असल्याचा आरोपही राजभर यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com