'या' राज्यात दोन दिवसांतील चाचण्यात आढळले तब्बल 84 टक्के ओमिक्रॉनबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

'या' राज्यात दोन दिवसांतील चाचण्यात आढळले तब्बल 84 टक्के ओमिक्रॉनबाधित

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या संकटांनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकीकडे अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन (Omicron variant) या व्हेरियंटचा धुमाकूळ सुरु झाला असून भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता एक अशी माहिती समोर येत आहे, जी थोडीशी भीतीदायक आहे. दिल्लीच्या (New Delhi) आरोग्य मंत्र्यांनी (Health Minister) राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर काळजी थोडी वाढली आहे.

हेही वाचा: इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारवर अंदाधुंद गोळीबार

दिल्लीमध्ये कोरोनाच्या सापडलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के नवे रुग्ण हे अत्यंत संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने बाधित असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. 30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवसांतील चाचण्यांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट्समधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या दोन दिवसांतील नमुन्यांपैकी 84 टक्के रिपोर्ट्स हे ओमिक्रॉन बाधित असल्याचं आढळून आलंय. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendar Jain) यांनी ही माहिती दिली आहे. सध्या देशातील जवळपास 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन विषाणू पसरला आहे. या 23 राज्यांपैकी महाराष्ट्र हेच राज्य सर्वांत अधिक संक्रमित राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात सध्या 510 ओमिक्रॉनबाधित रुग्ण असून त्याखालोखाल 351 रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडले आहेत.

हेही वाचा: अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम

पुढे जैन यांनी माहिती देताना हेही स्पष्ट केलंय की, राज्यातील दवाखाने आणि क्लिनीक्स चालवण्यामध्ये कसल्याही प्रकारचा तुटवडा नाहीये. शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. डिसेंबर ३०-३१ च्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार तीन प्रयोगशाळेतील 84 टक्के नमुन्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. बहुतेक प्रकरणे ओमिक्रॉनची आहेत, असं जैन दिल्ली विधानसभेत म्हणाले. शहरात रविवारी 3,194 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शनिवारच्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त रुग्ण सापडले आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून रविवारी संध्याकाळपर्यंत एकूण मृतांची संख्या 25,109 झाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Covid -19Omicron Variant
loading image
go to top