इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारवर अंदाधुंद गोळीबार I Imran Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan-Reham Khan

'मला सामान्य पाकिस्तानीप्रमाणे पाकिस्तानात जगायचं आणि मरायचंय.'

इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारवर अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तान : पंतप्रधान इम्रान खानची (Imran Khan) घटस्फोटीत पत्नी रेहम खानवर (Reham Khan) हल्ला करण्यात आला असून त्यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. हा सगळा प्रकार घडला, जेव्हा रेहम खान या लग्न आटोपून घरी परतत होत्या, त्यावेळी त्यांच्या गाडीवर अचानक गोळीबार झाला. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिलीय. रेहम यांनी ट्विटव्दारे इम्रान खान सरकारवर निशाणा साधलाय. एवढंच नाही, तर हाच आहे का नवा पाकिस्तान? असा सवालही उपस्थित केलाय.

दरम्यान, रेहम यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय की, माझ्या पुतण्याच्या लग्नानंतर रात्री घरी परतत होतो, त्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारवर गोळीबार केला. त्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी सुरक्षा कर्मचारी आणि चालकही कारमध्ये उपस्थित होते. मी माझी गाडी बदलली, असं म्हणत त्यांनी हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान (Pakistan) आहे का? लुटारू, भ्याड आणि लोभी लोकांच्या देशात आपलं स्वागत आहे, असा त्यांनी निशाणा साधलाय.

हेही वाचा: राज्यमंत्र्यांची थेट BJP आमदाराला राष्ट्रवादीत येण्याची 'ऑफर'

मला सामान्य पाकिस्तानीप्रमाणे पाकिस्तानात जगायचं आणि मरायचंय. माझ्यावरील भ्याड हल्ल्याची जबाबदारी या कथित सरकारनं घ्यावी. मी माझ्या देशासाठी गोळी खाण्यास तयार आहे. मला मृत्यूची कदापि भीती वाटत नाही, परंतु मला माझ्यासाठी काम करणाऱ्या लोकांची काळजी वाटते, असं रेहम यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हंटलंय. ब्रिटिशमधील (British) पाकिस्तानी वंशाची पत्रकार रेहम खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची दुसरी पत्नी आहे. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. रेहम खान यांनी इम्रान खानवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक मुद्द्यांवर घटस्फोटीत पतीला घेरलंय.

हेही वाचा: 25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top