चीननंतर पाकला खुमखुमी; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
Monday, 22 June 2020

चीननंतर पाकिस्तानला खुमखुमी आली असून, त्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने आज (सोमवार) पहाटे केलेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाला आहे.

श्रीनगर: चीननंतर पाकिस्तानला खुमखुमी आली असून, त्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने आज (सोमवार) पहाटे केलेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाला आहे.

भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला. आपल्या जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जवान हुतात्मा झाला आहे.

भारतीय जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल आनंद यांनी दिली आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे.

चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one indian soldier has lost his life in the ceasefire violation by pakistan army