esakal | भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...
sakal

बोलून बातमी शोधा

jammu kashmir 4 pakistani soldiers killed at the pok

पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने जोरदार कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धस्त झाल्या असून, त्यांचे सैनिक पळत सुटले.

भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या आठवड्यात सीमेवर एक जवान हुतात्मा झाला होता. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने जोरदार कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धस्त झाल्या असून, त्यांचे सैनिक पळत सुटले.

चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना...

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर पाकिस्तानने बुधवारी रात्री पुन्हा एकदा शस्रसंधीच्या उल्लंघन केले. भारतीय सैन्य दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्य दलाने पाकव्यप्त काश्मीरमधील बीआयएमबी, नीलम आणि नकयाल सेक्टरमधी पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. जवानांच्या या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या 4 सैनिकांचा मृत्यू तर अनेक सैनिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी चौक्या सोडून पळ काढला.

'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचे बुधवारी (ता. 17) उल्लंघन करण्यात आले होते. वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. पाक सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारत-चीन सीमेवरील लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यामधील संर्घषामुळे तणाव असतानाच पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. या कुरघोड्यांना भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर देत पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.