CM Hemant Soren : " जमीन गैरव्यवहारप्रकरणी झारखंडमध्ये आणखी एकाला अटक

याप्रकरणात अतापर्यंत अफसरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक
अटकsakal

रांची ः झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) आणखी एकाला अटक केल्याची माहिती मंगळवारी अधिकृत सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे या प्रकरणाशी संबंधित अंटू तिर्की या व्यक्तीशी निगडित रांची येथील ठिकाणांवर ईडीच्यावतीने शोधमोहीमही राबविण्यात आली.

अटक
Tumsar News : निवडणुकीच्या पेन्डॉलला वादळाचा तडाखा

जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अफसर अली असे असून त्याला अन्य एका गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता सोरेन यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या अफसर याचे लागेबांधे असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या चौकशीसाठी संबंधित न्यायालयाच्या परवानगीने ईडीने त्याचा ताबा घेतला आहे.

जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी असलेले हेमंत सोरेन आणि महसूल विभागाचे माजी उपनिरीक्षक भानुप्रताप प्रसाद यांच्याबरोबर बेकायदा जमीन खरेदी करण्यात अफसर याचाही सहभाग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणात अतापर्यंत अफसरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com