Diwali 2020 : इको फ्रेंडली दिवाळी; जाणून घ्या 'ग्रीन क्रॅकर्स' म्हणजे काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

green crackers

आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये यावेळी ग्रीन फटाके (Green crackers ) उडवण्याला परवानगी देण्यात आली आहे.

Diwali 2020 : इको फ्रेंडली दिवाळी; जाणून घ्या 'ग्रीन क्रॅकर्स' म्हणजे काय ?

नवी दिल्ली : कोरोना हा श्वसनाच्या विकारासंबधीचा आजार आहे. आधीच कोरोनामुळे देशात हाहाकार माजला असताना दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोना बाधितांना, लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक राज्य शासनांकडून फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही राज्यात फक्त ग्रीन क्रॅकर्स वाजवण्याचीच परवानगी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये यावेळी ग्रीन फटाके (Green crackers ) उडवण्याला परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये आधी फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नंतर या निर्णयात सुधारणा करत सरकारने ग्रीन क्रॅकर्स उडवण्याला परवानगी दिली आहे. 

हेही वाचा - गीरमध्ये मगरीची झडप; नदीकाठावर भांडी घासणाऱ्या मुलीचा वेदनादायी मृत्यू

आंध्र प्रदेशने सुद्धा फक्त ग्रीन क्रॅकर्स विकण्याला आणि वापरण्याला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी फक्त रात्री 8 ते 10 च्या दरम्यानच देण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीदेखील ग्रीन क्रॅकर्स उडवण्याला परवानगी दिली आहे. दिवाळी आणि गुरुपुरब या सणाला फक्त दोन तास हे फटाके उडवण्याची परवानगी आहे. दिल्लीमध्ये सुद्धा फक्त दोन प्रकारच्या ग्रीन क्रॅकर्सच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये फुलबाजा आणि साधे फटाक्यांचा समावेश आहे. संपुर्ण भारतात फक्त 30 फटाक्यांच्या निर्मात्यांना ग्रीन फटाके बनवण्याची परवानगी आहे. उत्तराखंड सरकारने सुद्धा ग्रीन क्रॅकर्सच्या विक्रीला परवानगी दिली आहे. 

हेही वाचा - 50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला

ग्रीन क्रॅकर्स म्हणजे काय? 
- 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांना बंदी घातली आहे. तसेच फक्त ग्रीन क्रॅकर्सना परवानगी दिली आहे. यामुळे प्रदुषणात 30 टक्क्यांनी घट होते. 
- या ग्रीन क्रॅकर्सचे संशोधन आणि निर्मिती CSIR-NEERI च्या शास्त्रज्ञांनी कोर्टाच्या आदेशाने केली होती.
- ग्रीन क्रॅकर्स म्हणजे असे फटाके जे आकाराने लहान असतील तसेच कमी हानीकारक घटकांचे उत्सर्जन करणारे असतील. 
- ग्रीन क्रॅकर्समध्ये बंदी घालण्यात आलेले केमिकल्स म्हणजे लिथीअम, अर्सेनिक, बॅरियम आणि शिसे हे घटक असणार नाहीत. त्यांना Safe Water Releaser (SWAS) असंही म्हटलं जातं. 
- ग्रीन क्रॅकर्स हे दोन प्रकारात मिळतात. एक म्हणजे बॅरियम या केमिकल शिवाय आणि दुसरं म्हणजे कमी प्रमाणातील बॅरियमसह. 
- या दोन्ही प्रकारच्या ग्रीन क्रॅकर्समुळे जवळपास 30 ते 35 टक्के कमी प्रदुषण होते. ग्रीन क्रॅकर्स फक्त 125 डेसिबल इतकाच आवाज करतात असंही संशोधनात सिद्ध झालं आहे. इतर नेहमीचे फटाके हे 160 डेसिबलहून अधिक आवाज करतात. 
- बेरियम नायट्रेट हा प्रदुषण करणारा घटक ऍटम बॉम्बसारख्या फटाक्यांमध्ये वापरला जातो. 


 

Web Title: Only Green Firecrackers Are Allowed Diwali Know What Are Green Firecrackers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaDiwali Festival
go to top