
Defence Budget: भारत-पाकिस्तान दरम्यान सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसंच ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवणी मागणीद्वारे बजेटमध्ये या अतिरिक्त खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याला खर्चाला येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळू शकते. या अतिरिक्त बजेटचा वापर नवीन शस्त्रं खरेदी आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी तसंच तंत्रज्ञानासाठी खर्च केला जाईल, अशी माहिती मिळते आहे.