'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

टीम ई सकाळ
Sunday, 12 January 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकारवरून विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकारवरून विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाहीत. "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" हे मनाला पटत नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

तर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही या प्रकारावरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. निदान महाराष्ट्र भाजपने तरी यावर भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सुर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयनराजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
 

 

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे बांधकाम उपक्रममंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

तत्पूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर भाजप नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला मात्र सोशल मीडियावरून विरोध होत असल्याचे दिसत आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे असून महाराष्ट्रासह देशात यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader angry on BJP for publication of Aaj ke Shivaji Narendra Modi book