मोदींच्या राजकीय कारकीर्दीवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

दरम्यान दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे ही राष्ट्रीय परिषद होणार
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीsakal

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या दोन दशकांच्या राजकीय कारकीर्दीवर दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आली आहे. येत्या 27 ते 29 ऑक्टोबर या दरम्यान दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे ही राष्ट्रीय परिषद होणार आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही परिषद आयोजित केली आहे. लोकशाहीची परिणामकारता (डिलिव्हरिंग डेमॉक्रसी) : नरेंद्र मोदी यांच्या 20 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा, असा परिषदेचा विषय आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नरेंद्र मोदी
PM किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी नोंदणी करताना चूक झालीय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती यावेळी असेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत समारोप होईल. मोदी यांचे परराष्ट्र धोरण, गरीब कल्याण योजना, नवीन शैक्षणिक धोरण आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. देशातील विविध विषयांवरील तज्ज्ञ आणि अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

मोदी सरकारच्या काळातील आरोग्य आणि कोविड व्यवस्थापन, सामाजिक न्याय, महिला सबलीकरण तसेच लोकन्यायाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांचे कौशल्य, मोदी सरकारचे कृषी धोरण आदी विषय देखील परिषदेत चर्चिले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com