तेव्हा 64,800 काश्मिरी पंडित कुटुंबांनी खोरं सोडलं : केंद्र सरकार

over 64800 Kashmiri pandit families left Kashmir valley in early 1990 center govt
over 64800 Kashmiri pandit families left Kashmir valley in early 1990 center govt

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी देशात काश्मिरी पंडीतांबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. यानंतर आता केंद्र सरकारकडून विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडीतांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला बळी पडून1990 च्या दशकाच्या सुरुवातीला 64,827 काश्मिरी पंडित कुटुंबांना काश्मीर खोरे सोडून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागात स्थलांतरीत व्हावे लागले, असे सरकारने म्हटले आहे.

गृह मंत्रालयाच्या 2020-21 च्या वार्षिक अहवालानुसार, 1990 ते 2020 दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये 14,091 नागरिक आणि 5,356 सुरक्षा दलाचे जवान दहशतवादाला बळी पडले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी गुंतागुंतीचे संबंध असल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.

काश्मिरी पंडितांव्यतिरिक्त, दहशतवादामुळे काही शीख आणि मुस्लिम कुटुंबांनाही काश्मीर खोऱ्यातून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागात स्थलांतरित होण्यास भाग पाडले, असे त्यात म्हटले आहे. जम्मूच्या डोंगराळ भागातील सुमारे 1,054 कुटुंबे जम्मूच्या मैदानी भागात स्थलांतरित झाले असल्याची माहिती देखील या रिपोर्मध्ये देण्यात आली आहे.

over 64800 Kashmiri pandit families left Kashmir valley in early 1990 center govt
'त्यांच्याकडं जातीचं अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी..'; राणांना रोहित पवारांचा टोला

जम्मू आणि काश्मीरच्या मदत आणि स्थलांतरित आयुक्तांकडे उपलब्ध नोंदीनुसार, सध्या 43,618 नोंदणीकृत काश्मिरी स्थलांतरित कुटुंबे जम्मूमध्ये स्थायिक आहेत, 19,338 कुटुंबे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) आणि 1,995 कुटुंबे काही इतर राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थायिक आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

काश्मिरी स्थलांतरितांचे खोऱ्यात पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने, गृह मंत्रालयाने पंतप्रधान पुनर्निर्माण पॅकेज - 2008 अंतर्गत जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये 3,000 नोकऱ्या आणि पंतप्रधान विकास पॅकेज - 2015 (PMDP-2015) अंतर्गत अतिरिक्त 3,000 नोकऱ्या मंजूर केल्या आहेत.

या 6,000 काश्मिरी स्थलांतरित कर्मचार्‍यांना काश्मीर खोऱ्यात ठेवण्यासाठी, 920 कोटी रूपये खर्चाच्या 6,000 ट्रान्झिट घरांच्या बांधकामालाही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. योजनेअंतर्गत, 1,025 फ्लॅट पूर्ण झाले आहेत आणि 1,488 बांधकामाधीन आहेत.

over 64800 Kashmiri pandit families left Kashmir valley in early 1990 center govt
नवनीत राणांच्या आरोपांवर सावंत म्हणाले,"हा सूर्य आणि हा जयद्रथ…"

अहवालात म्हटले आहे की 2014 ते 2020 या कालावधीत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानने प्रायोजित केलेले एकूण 2,546 दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये 481 सुरक्षा कर्मचारी मारले गेले आणि 215 नागरिक आणि 1,216 दहशतवादी मारले गेले.

2014 ते 2020 दरम्यान सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे 1,776 प्रयत्न झाले, त्यापैकी 685 यशस्वी झाले. या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, PMDP-2015 अंतर्गत, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POJK), छंब आणि नियाबत येथून विस्थापित झालेल्या आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या 36,384 कुटुंबांना 5.50 लाख रूपयांची आर्थिक मदत देखील वितरित केली जात आहे.

केंद्र सरकारने त्या विस्थापित व्यक्तींच्या (DP) कुटुंबांना सर्वसमावेशक आर्थिक मदत मंजूर केली आहे. PoJK येथील 5,300 DP कुटुंबांपैकी, 1,947 कुटुंबांनी सुरुवातीला जम्मू आणि कश्मिर राज्याच्या बाहेर जाण्याचा पर्याय निवडला होता, परंतु नंतर ते परत आले आणि तिथेच स्थायिक झाले. 31 डिसेंबर 2020 पर्यंत 31,670 लाभार्थ्यांना एकूण 1,371.13 कोटी वितरित करण्यात आले आहेत.

over 64800 Kashmiri pandit families left Kashmir valley in early 1990 center govt
देशात पुन्हा कोरोनाचे संकट; दिल्लीनंतर कर्नाटकातही मास्क अनिवार्य

1947 च्या फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानच्या अनेक भागांतून स्थलांतरित झालेल्या पश्चिम पाकिस्तान निर्वासितांच्या (West Pakistan Refugees) 5,764 कुटुंबांसाठी 317.02 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून प्रति कुटुंब 5.5 लाख रूपयांची आर्थिक मदत देखील सरकारने मंजूर केली आहे. ते जम्मूच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com