esakal | Video: आयेशा खान प्रकरणावर ओवेसींचा संताप; हुंडा प्रथा संपवण्याचं केलं आवाहन

बोलून बातमी शोधा

owaisi1}

"अन्याय-अत्याचार करणाऱ्या पतीला लाथ मारा प्रसंगी कायद्याचा आधार घ्या"  

Video: आयेशा खान प्रकरणावर ओवेसींचा संताप; हुंडा प्रथा संपवण्याचं केलं आवाहन
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काही दिवसांपासून आत्महत्येच्या व्हिडिओमुळं चर्चेत आलेल्या गुजरातमधील आयेशा खान या मुस्लिम महिलेच्या करुण कहाणीवर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. एकूणच भारतीय समाजाला आरसा दाखवत मुस्लिमांसह सर्वच समाजानं हुंडा प्रथा बंद करावी असं आवाहन त्यांनी केलं. एका सभेत बोलतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी त्यांनी मुलींना आपलं जीवन अमुल्य असून ते वाया घालवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं भावनिक आवाहनही केलं. 

Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?

अहमदाबादमधील एका मुसलमान मुलीचा दुःखदायक व्हिडिओ समोर आला आहे जीनं आत्महत्या केली आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो, ही हुंडाप्रथा बंद करा. तुम्ही मर्द आहात तर पत्नीवर अन्याय-अत्याचार करणं, तिला मारहाण करणं, तिच्याकडे पैशांची मागणी करणं ही मर्दानगी नाही. त्या बिचाऱ्या मुलीवर अन्याय करुन तिच्याकडे वारंवार हुंड्याची मागणी करुन तिला आपलं जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींना याची लाज वाटायला हवी. मी तर अल्लाहकडे मागणी करेन त्याने तुम्हाला कडक शिक्षा द्यावी, तुम्ही त्या बापाचं दुःख जाणू शकत नाही ज्यांचा आपल्या मुली किती जीव असतो. मला असे अनेक लोक माहिती आहेत जे आपल्या शेवटच्या क्षणी माझा हात हातात घेऊन विनंती करतात की मुलीचं लग्न आहे थोडी मदत करा.

आएशाचा शेवटचा कॉल होतोय व्हायरल; नवरा म्हणाला 'जीव देतानाचा व्हिडिओ पाठवून दे'!


 

तुमच्यातील माणुसकी मेली आहे का?
 
काय झालंय तुम्हाला, अशा किती महिलांना तुम्ही मारणार आहात? कसले मर्द आहात तुम्ही? तुमच्यातील माणुसकी मेली आहे का? असे किती लोक आहेत जे पत्नीला मारहाण करतात त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करतात, त्यांच्यावर आरोप करतात, त्यांच्याकडे हुंडा मागतात आणि घराबाहेर आल्यानंतर आपणं मोठे देवदूत असल्याचं सांगतात. तुम्ही जगाला धोका देऊ शकता पण अल्लाहला धोका देऊ शकत नाहीत. अल्लाह सगळं काही बघत आहे आणि तो निरपराधांचाच साथ देणार आहे. 

Justice for ayesha: आयेशाचा पती आरिफ अटकेत; मोबाईल लोकेशनमुळे सापडला जाळ्यात

अन्याय करणाऱ्या पतीला लाथ मारा प्रसंगी कायद्याची मदत घ्या

ओवेसी पुढे म्हणाले, आपल्या घरातच असा अन्याय-अत्याचार होतं असेल तर ते आधी संपवा त्यानंतर जर आपल्या मोहल्ल्यात असं होतं असेल तर त्या लोकांना समजावून सांगा आणि असे प्रकार थांबवा. तसेच मी आपल्या मुलींना आवाहन करेन की तुम्ही घाबरु नका तुम्ही आजिबात टोकाचा विचार करु नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची किंमत आहे माझ्या मुलींनो. तुमच्यावर अन्याय करणाऱ्या त्या पतीला लाथ मारा त्यासाठी कायद्याची मदत घ्या पण आपला जीव देऊ नका तो अमुल्य आहे. ही वाईट प्रथा आपल्याला संपवायची आहे त्यांची साथ द्या.  
 

भारत India