esakal | Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!

बोलून बातमी शोधा

Ayesha_Ahmedabad}

एक गोष्ट मी शिकली. प्रेम करायचं असेल तर दुतर्फा करा, एकतर्फी प्रेमातून काही मिळू शकत नाही. कुछ मोहब्बते अधुरी रहती है.

Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदाबाद : आयुष्यात स्वत:कडून तसेच इतरांकडूनही आपल्याला अनेक गोष्टींची अपेक्षा असते, कधी त्या पूर्ण होतात तर कधी नाही, पण म्हणून त्याबद्दल नाराज न होता, हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. जगाचा निरोप घेण्याआधी या तरुणीच्या चेहऱ्यावर दु:खाचा पुसटसा लवलेशही जाणवत नाही, हे विशेष.

अहमदबादमधल्या या २३ वर्षीय तरुणीचं नाव आहे आएशा. साबरमती नदीवरील रिव्हरफ्रंट वॉक वे ब्रीजवरून तिनं उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तिनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. आपल्या आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्यामागची वेदना तिनं यावेळी बोलून दाखवली आहे. कुटुंबीयांकडून विश्वासघात झाल्याची वेदना तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसून येते, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं करून गेलं. 

हयगय नाही! हत्येप्रकरणी कोंबड्याला झाली अटक; कोर्टात होणार सादर​

मेरी तकदीर मे कमी रह गयी
व्हिडिओमध्ये आएशा म्हणते की, माझं नाव आएशा आरिफ खान आहे. मी जे काही करत आहे तो माझा निर्णय आहे. आणि यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. आरिफला (तिचा नवरा) स्वातंत्र्य पाहिजे, मी त्याला कायमचं स्वातंत्र्य देत आहे. कारण मी अल्लाला भेटायला जात आहे. मी अल्लाला विचारेन की, माझ्याकडून काय कमी राहिली. आई-वडील चांगले भेटले, मित्रही चांगले भेटले. पण कुठंतरी कमी राहिली. 'मुझमे या शायद मेरी तकदीर में कमी रह गयी.' 

आएशा पुढे म्हणाली, मी शांततेनं जगाचा निरोप घेऊ इच्छिते आणि अल्ला यानंतर कुठल्या माणसाचं तोंड दाखवू नको. एक गोष्ट मी शिकली. प्रेम करायचं असेल तर दुतर्फा करा, एकतर्फी प्रेमातून काही मिळू शकत नाही. कुछ मोहब्बते अधुरी रहती है, असं म्हणताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलल्याचे दिसून येतात. 

पंतप्रधान झाल्यानंतरही मोदी आपली मूळं विसरले नाहीत; आझाद यांच्याकडून कौतुक

बस दुआओं में याद रखना
मी प्रार्थना करते की ही प्रिय नदी (साबरमती) मला सामावून घेईल. माझ्यामागे कोणतंही भांडण उभं करू नका. आणि कोणालाही त्यासाठी जबाबदार धरलं जाऊ नये. मी हवेसारखी आहे. मला हवेसारखं वाहायचंय. कुणासाठीही थांबायचं नाहीय. मी आज खूप खूश आहे. कारण ज्या प्रश्नांची उत्तर मला हवी होती, ती मला मिळाली आहेत. आणि मला ज्यांना काही सांगायचं होतं ते सांगून झालं आहे. बस दुआओं में याद रखना, क्या पता मुझे जन्नत मिले या ना मिले, चलों अलविदा, असं म्हणत तिनं व्हिडिओचा आणि आपल्या आयुष्याचाही शेवट केला.

'भारत-पाकिस्तान दोन्ही देश सारखेच दिसतात'; अभिनंदन वर्धमान यांचा व्हिडिओ व्हायरल​

हुंड्यासाठी सासरच्यांनी दिला त्रास
अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आएशाचं जुलै २०१८ मध्ये आरिफ खानसोबत लग्न झालं होतं. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये ती आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. त्यांच्या समाजातील काही सदस्यांनी मध्यस्ती करत त्यांचं वैवाहिक जीवन पुन्हा रुळावर आणलं. यावेळी तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना दीड लाख रुपये दिलं होते. पुन्हा सासरच्या मंडळींनी पहिल्यासारखं वागायला सुरवात केल्यानं आएशा पुन्हा पालकांकडे गेली होती. या सर्वाला कंटाळून शेवटी तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)