
जगभरात कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताची कोरोना लसीकरणाची मोहिम जगात सर्वांत मोठी असेल. भारताने कोरोना लशीमध्ये औषधांचा प्राप्तकर्ता तसेच उत्पादक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत फिच सोल्यशुन्स कंट्री रिस्क ॲंड इंडस्ट्री रिसर्चने भारताचे कौतुक केले आहे.
सिंगापूर - जगभरात कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताची कोरोना लसीकरणाची मोहिम जगात सर्वांत मोठी असेल. भारताने कोरोना लशीमध्ये औषधांचा प्राप्तकर्ता तसेच उत्पादक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत फिच सोल्यशुन्स कंट्री रिस्क ॲंड इंडस्ट्री रिसर्चने भारताचे कौतुक केले आहे.
जगात लसनिर्मिती क्षमता सर्वाधिक असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. सिरम इन्स्टिट्यूट लशीची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी आहे. त्याचप्रमाणे, ‘ॲस्ट्राजेनिका’, ‘नोवावॅक्स’ या लशींच्या व्यापक उत्पादनालाही भारताने मान्यता दिली आहे.सुमारे १३० कोटी लोकसंख्येमुळे भारताची कोरोना लसीकरण मोहिम जगात सर्वांत मोठी असेल, असे फिचने म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतात सध्या दररोज कोरोनाच्या १० लाख चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. याच धर्तीवर देशाने लसीकरणाला वेग दिल्यास जून २०२१ पर्यंत पहिल्या फळीव्यतिरिक्तच्या व्यक्तींनाही लस मिळू शकते. त्यासाठी देशाला तुलनेने कमकुवत संस्था आणि आरोग्यातील पायाभूत सुविधांच्या कमतरतेवरही मात करावी लागेल, असेही फिचने नमूद केले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकारावर BioNTech ने दिली दिलासादायक बातमी
विकसित बाजारपेठा फायझर, मॉडर्नाची लस खरेदी करणार असून मजबूत आरोग्ययंत्रणा असणाऱ्या छोट्या देशांना लवकर लस निर्मिती करता येईल, असेही फिचचे निरीक्षण आहे.
२०२२ मध्येही लसीकरण
वैविध्यपूर्व आरोग्ययंत्रणा आणि लोकसंख्येमुळे लशीच्या व्यावहारिक प्रशासनातही फरक अपेक्षित आहे. जगातील काही देशांना दैनंदिन लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर लसीकरणाला २०२२ही उजाडू शकते, असेही फिचने म्हटले आहे.
मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू
सहा महिन्यांत २५ कोटी लोकांना लस
भारताला विविध आजारांवर व्यापक लसीकरण मोहिमेचा अनुभव आहे. यात ‘पोलिओ’, ‘कॉलरा’सारख्या आजारांवर नियमितपणे लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या. देशात पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत कोरोना लसीकरणाला सुरवात होईल. यात पहिल्या फळीतील आरोग्यसेवक व ५० वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. सरकारने सहा ते आठ महिन्यांत २५ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे महत्वाकांक्षी ध्येय ठेवल्याचेही फिचने नमूद केले आहे.
Edited By - Prashant Patil