esakal | मोठी बातमी : भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत 
sakal

बोलून बातमी शोधा

oxford covid vaccine 50 percent for India serum institute ceo adar poonawalla

कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणार असल्याची माहिती, सीरम इन्सटिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

मोठी बातमी : भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत 

sakal_logo
By
रविराज गायकवाड

पुणे : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लस संशोधनात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतली. मानव जातीसाठी अक्षरशः संजीवनी ठरेल, अशी ही लस येत्या काही दिवसांत, अंतिम चाचण्यांनंतर जगभरात वितरीत होण्याची शक्यता आहे. या लस संशोधनात भारतातील एका बड्या कंपनीचं योगदान असल्यामुळं भारताला या संसोधनाचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील सीरम इन्सटिट्यूट या लस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणार असल्याची माहिती, सीरम इन्सटिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

सरकार देणार लस 
आदर पुनावाला यांनी इंडिया टुडे टीव्हीला विशेष मुलाखत दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीच्या चाचण्या अतिशय योग्य पद्धतीनं सुरू आहेत, असं पुनावाला यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं. ते म्हणाले, 'ऑक्सफर्ड विद्यापीठाचे लस संशोधनातील भागीदार म्हणून, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लस उत्पादनात मोठे योगदान असणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्याची रितसर अनुमती घेण्याचे काम सुरू आहे. ही चाचणी भारतात झाली आणि त्याचे चांगले परिणाम दिसले तर, मोठ्या प्रमाणात लस उत्पादन सुरू करता येईल.' नियोजनाप्रमाणं जर लसीच्या चाचण्या झाल्या तर, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट काही लाख डोस तयार करू शकेल आणि 2021च्या मार्चपर्यंत जवळपास 30 ते 40 कोटी डोस तयार असतील, असंही अदर पुनावाला यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही, सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. 

आणखी वाचा - महाराष्ट्र-केरळ ट्रक पोहोचला एक वर्षानंतर पोहोचला!

आम्हाला सरकारचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आमच्या लस उत्पादनातील 50 टक्के लस भारतासाठी देण्यात येईल हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. उर्वरीत 50 टक्के उत्पादन हे जगातील इतर देशांसाठी असेल. संपूर्ण जग कोरोनाशी लढ देत आहे आणि आपल्याला संपूर्ण जगाचं या रोगापासून रक्षण करायचं आहे.
- आदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट