esakal | 'जगाला दिलेलं शहाणपण आधी भारतात अंमलात आणा'
sakal

बोलून बातमी शोधा

'जगाला दिलेलं शहाणपण आधी भारतात अंमलात आणा'

'जगाला दिलेलं शहाणपण आधी भारतात अंमलात आणा'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी ‘G-7’ देशांच्या परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. ‘ओपन सोसायटीज अ‍ॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ या सत्रामध्ये PM मोदी व्हर्च्यूअल पद्धतीने सहभागी झाले होते. दहशतवाद आणि आर्थिक जुलूम याच्या विरोधात भारत G-7 राष्ट्रांचा नैसर्गिक रित्या एक सहकारी असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं होतं. यासंदर्भातच आता काँग्रचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदींनी या परिषदेत केलेल्या भाषणावर टीका करत चिदंबरम यांनी म्हटलंय की, G-7 राष्ट्रांच्या परिषदेत लोकशाही आणि विचार स्वातंत्र्यावर भर देण्याबद्दल मोदींनी दिलेलं भाषण प्रेरणादायी होतं. मात्र तसंच ते विचित्र देखील होतं. मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी, अशी बोचरी टीका चिदंबरम यांनी केली आहे. (P Chidambaram on PMs G7 speech says Modi Government should practise in India what it preaches to world)

हेही वाचा: महागाईच्या आघाडीवर सरकारला झटका; 'मे' महिन्यातील दर वाचा

हेही वाचा: 'नवं गुजरात मॉडेल'; मोदींच्या राज्यात केजरीवाल लढवणार सर्व जागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव अतिथी होते जे आउटरीच परिषदेत थेट उपस्थित नव्हते, ही खेदाची बाब आहे. कारण कोरोना विरोधातील लढाईबाबत विचार केला तर भारतातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर आपण सर्वांधिक संक्रमित आणि सर्वांत कमी लसीकरण झालेला देश आहोत, असंही चिदंबरम म्हणाले आहेत.

हेही वाचा: इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या सदिच्छा; नेतन्याहूंना म्हणाले...

काय म्हणाले होते PM नरेंद्र मोदी?

हुकूमशाही, दहशतवाद, फेक न्यूज आणि आर्थिक बळजबरीतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या धोक्यांपासून मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी भारत पहिल्यापासूनच G-7 चा एक नैसर्गिक भागीदार आहे, असं पंतप्रधान मोदींनी रविवारी G-7 शिखर परिषदेत सांगितलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, G-7 शिखर परिषदेच्या ‘ओपन सोसायटीज अ‍ॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ सत्रात आपल्या भाषणात मोदींनी लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य याविषयी भारताच्या वचनबद्धतेवर जोर दिला होता.

loading image