
Padma Vibhushan Pandit Chhannulal Mishra Passes Away at 91
Esakal
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन झालं. गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी मिर्झापूरमध्ये रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. छन्नूलाल मिश्र यांच्यावर काशीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव बनारसला नेण्याची तयारी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचं खास कनेक्शन होतं. २०१४च्या निवडणुकीत वाराणसीत छन्नूलाल मिश्र हे मोदींचे प्रस्तावक होते.