
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ जणांची नावं समोर आली आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ६ जणांचा मृत्यू झालाय. तर कर्नाटक, गुजरातमधील प्रत्येकी तीन पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते.