
Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झालाय. दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांची नावे समोर आली आहेत. त्यात लेफ्टनंट विनय नरवाल या नौदल अधिकाऱ्याचंही नाव आहे. ते कोच्चीमध्ये तैनात होते. गेल्या आठवड्यातच विनय नरवाल यांचं लग्न झालं होतं. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नरवाल यांचा मृत्यू झाला.