
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरशी संबंधित केंद्र सरकारच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की सरकारने पुरेशी माहिती दिली नाही आणि सरकारवर महत्त्वाचे तपशील शेअर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. दरम्यान भाजपनेही चिदंबरम यांच्या या विधानवार टीका केली आहे.