पाच तासात 300 रुपयात केरळचा 72 वर्षीय पेंटर झाला 12 कोटींचा मालक

ड्रॉ संपण्याच्या पाच तास आधी खरेदी केली लाॅटरी
Kerala
KeralaEsakal

आपण अनेकदा एसटी स्टॅंन्डवर लाॅटरीच्या दुकानावर हौशा- नवशांची गर्दी पाहतो. विशेषता ग्रामीण भागातील असे काही लोक असतात जे नियमित लाॅटरीचे तिकिट काढतातच. एक ना एक दिवस नशिब उजाडेल ही आशा त्यांना असते. पण कधी-कधी विश्वास बसणार नाही अशा लोकांना याचा लाभ मिळतो. नकळत जेव्हा अस मोठ्ठं घबाड जेव्हा हाती लागत तेव्हा मात्र संधीच सोनं झाला अस फिल होत. आयुष्याची ७२ वर्षे संघर्षात घालवणाऱ्या पेंटरला १२ कोटींची बंपर लॉटरी लागली आहे. केरळ (Kerala)सरकारच्या ख्रिसमस-न्यू इयर (Christmas-New Year)बंपर लॉटरीत केरळमधील कोट्टायम (Kottayam) येथे राहणाऱ्या सदानंदन यांना हि लाॅटरी लागली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळच्या एका ड्रायव्हरने लॉटरीत १२ कोटी रुपये जिंकले होते. त्यानंतर केरळमधील कुदयमपाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या सदानंदन यांनी हे बक्षिस जिंकले आहे. सदानंदन गेल्या ५० वर्षांपासून पेंटिंगचे काम करतात. ड्रॉ संपण्याच्या पाच तास आधी त्यांनी एका दुकानदाराकडून ३०० रुपयाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. यात त्यांनी १२ कोटींची रक्कम जिंकली आहे.

"मी बक्षिसाच्या रकमेतून माझ्या मुलांच्या भविष्याची काळजी घेईन," असे सदानंदन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मी रविवारी सकाळी जवळच्या बाजारातून मांस विकत घेण्यासाठी जात होतो. त्याचवेळी मी हे तिकीट सेल्वन (तिकीट विक्रेता) कडून घेतले होते.’ हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com