esakal | पाकिस्तानने खरे रंग दाखवले, दोन महिन्यात मोडला करार
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan prime minister imran khan

पाकिस्तानने खरे रंग दाखवले, दोन महिन्यात मोडला करार

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: विश्वासघातकी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. अवघ्या दोन महिन्यातच केलेला करार मोडला आहे. पाकिस्तानने दोन महिन्यांपूर्वी भारताबरोबर शस्त्रसंधी करार केला होता. पण आज पाकिस्तानी रेंजर्सनी या कराराचे उल्लंघन केले. जम्मूच्या सांबा जिल्ह्यात रामगड सेक्टरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील BSF च्या जवानांवर पाकिस्तानी रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानला लागून असलेली ही आंतरराष्ट्रीय सीमा २०० किमीपर्यंत पसरलेली आहे. (Pakistan breaches renewed ceasefire deal opens fire along Jammu border)

"सकाळी ६.१५ च्या सुमारास रामगड सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानावर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. बॉर्डर फेन्सजवळ देखभालीचे काम करत असताना रेंजर्सनी गोळीबार केला" असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. 'गस्तीवर असलेल्या BSFच्या पथकातील कोणीही जखमी झालेले नाही' असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा

"टिपू आणि हुसैन या पाकिस्तानी पोस्टवर तैनात असलेल्या १० विंग चेनाब रेंजर्सनी माजरा येथे देखभालीचे काम करणाऱ्या बीएसएफच्या पथकावर गोळयांच्या २० फैरी झाडल्या" असे गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले. (Pakistan breaches renewed ceasefire deal opens fire along Jammu border)

हेही वाचा: धक्कादायक! बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, मुलुंडमधील घटना

पाकिस्तानच्या गोळीबारानंतरही BSF च्या जवानांनी संयम दाखवला व प्रत्युत्तर दिले नाही. २५ फेब्रुवारीला दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा जुना करार पूर्ववत केला होता. त्यानंतर शस्त्रसंधी उल्लंघनाची ही पहिली घटना आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये सर्वप्रथम हा शस्त्रसंधीचा करार झाला होता. हाच जुना करार पूर्ववत करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. याआधी पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करता यावी, त्यांना मदत व्हावी, यासाठी शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचा.

loading image