पाकिस्तान युध्दकैदी मेजर सिंग यांच्या सुटकेवर SC ने मागितले उत्तर

मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने याचिका दाखल केली आहे.
Supreme Court
Supreme Court e sakal

पन्नास वर्षापासून पाकिस्तानच्या कैदेत असलेले (Pakistan) मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. मेजर कंवलजीत सिंग (Major Kanwaljit Singh) यांच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती. ज्यामध्ये त्यांनी पतीच्या सुटकेची मागणी केली होती. १९७१ च्या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना (Indian Soldier) पाकिस्तानने कैद केले होते. ज्यामध्ये जसबीर कौर यांचे पती मेजर कंवलजीत सिंह यांचाही सहभाग होता.

Supreme Court
शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले, शाहिद आफ्रिदी 'ट्रोल' झाला

दरम्यान, या याचिकेत युद्धातील कैद्यांची सुटका करण्याची, तसेच युद्धबंदीच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅप्टन सौरभ कालिया आणि चार जाट रेजिमेंट सैनिकांच्या हत्येचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत असेही म्हटलं आहे की, भारतीय जवान जवळपास ५० वर्षांपेक्षा अधिक काळ पाकिस्तान कैदेत हलाखीचे जीवन जगत आहेत. तर पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या भारतीय सैनिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार असल्याचे भारताने सांगितले आहे.

Supreme Court
PM पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांची पेशावरमध्ये पहिली रॅली

मेजर कंवलजीत सिंह यांच्या पत्नी जसबीर कौर यांनी याचिकेत म्हटले आहे की, ५४ युद्धबंदी (POW) सैनिकांना अजूनही पाकिस्तान सरकारने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही महत्त्वाची बाब असून केंद्र सरकारकडे याचे उत्तर मागितले आहे. तसेच आता या प्रकरणावर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होणार असल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com