
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तान सीमेवर असलेल्या भागात हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या राजौरीत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी याबाबतची माहिती दिलीय.