
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानाचे शीर कापून पळवून नेले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी यापूर्वीही हेमराज या जवानाचे शीर कापून नेले होते.
श्रीनगर: भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानाचे शीर कापून पळवून नेले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी यापूर्वीही हेमराज या जवानाचे शीर कापून नेले होते.
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या सुरूच असून, सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमच्या (बॅट) जवानांनी शनिवारी (ता. 11) रात्री नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार केला. भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, गोळीबारादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. जवान हुतात्मा झाल्यानंतर ते जवानाच्या शवाजवळ आले आणि त्यांनी शीर कापून पाकिस्तानात पाकिस्तानात पळवून नेले. नियंत्रण रेषेवर पूँछ जिह्यात हा प्रकार घडला आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...
दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे गुलशनपोरा भागात सुरक्षादलाचे जवान आणि आणि दहशतवाद्यांमध्ये आज (सोमवार) चकमक झाली. त्या चकमकीत हिजबूल मुजाहिदीनचे दहशतवादी उमर फैयाज लोन, आदिल बशीर मीर आणि जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अहमद भट्ट अशा तिघांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले.
दरम्यान, भारत सरकार आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवरील जुन्या कुंपणांच्या जागी अँटी-कट (कापता न येणारे) कुंपण बसवण्याच्या तयारीत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर भारत-बांगलादेश सीमेवरील लाठितीरा येथील 7.18 किमीचे कुंपण बदलण्यात आले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिली. 7.18 कि.मी. च्या सीमावर्ती भागावर बसवण्यात येणाऱ्या कुंपणासाठी जवळपास 14 कोटी 30 लाख 44 हजार रुपयांचा खर्च आला असून, सरासरी एक किलोमीटरपर्यंत अँटी-कट कुंपण उभारण्याची किंमत सुमारे 1.99 कोटी रुपये असल्याचे या अधिकाऱ्याने या वेळी सांगितले.
जरुर वाचा - शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेत्यांनी भूमिका घ्यावी : संजय राऊत
नव्याने उभारण्यात येणारे कुंपण
कुंपण उभारण्यास लागणारा खर्च (1.99 करोड रुपये प्रती किलो मीटर)