
बोर्डाच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना परीक्षेवेळी अनावश्यक ताणतणाव येऊ नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असणारा ‘परीक्षा पे चर्चा` हा कार्यक्रम यंदा पुढच्या महिन्यात ऑनलाइन होणार आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कळविली आहे.
नवी दिल्ली - बोर्डाच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना परीक्षेवेळी अनावश्यक ताणतणाव येऊ नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असणारा ‘परीक्षा पे चर्चा` हा कार्यक्रम यंदा पुढच्या महिन्यात ऑनलाइन होणार आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कळविली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या कार्यक्रमात निवडक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतील. त्यासाठी एक ऑनलाइन स्पर्धा घेतली जाईल. त्यात यशस्वी ठरणाऱ्यांना गुणानुक्रमे ही संधी मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी २०१६ च्या मार्चपासून हा उपक्रम सुरू केला. मुख्यतः तालकटोरा अच्छादित मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व परीक्षेवेळी ताणतणावात वावरू नका, असा त्यांना व पालकांनाही सल्ला देतात. या कार्यक्रमांत शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात. हा कार्यक्रमही दरवर्षी विविध समाज माध्यमांवर थेट प्रसारित केले जातातच. मात्र यंदा कोरोना संकटामुळे हा उपक्रम ऑनलाइन घेतला जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विट करून ही माहिती दिली.
लईचं वाईट! घर बांधण्यासाठी ट्रंकमध्ये साठवले पैसै; आयुष्यभराच्या कमाईला वाळवी
कोरोना असला तरी यंदा बोर्डाच्या परीक्षा लेखी स्वरूपातच घेतल्या जातील असे शिक्षण मंत्रालयाने याआधीच जाहीर केले आहे. मात्र त्यापूर्वी होणारा मोदींचा हा कार्यक्रम मात्र यंदा ऑनलाइन (आभासी) पद्धतीने होईल असे निशंक यांनी जाहीर केले. मार्चमधील या प्रस्तावित कार्यक्रमाची तारीख जाहीर केलेली नाही.
यंदाही परीक्षांना सामोरे जाणाऱ्या शूर मुलांनी तयारी आतापासून सुरू केली आहे.त्यामुळे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमही परतणार आहे. तो सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला राहील
व तो ऑनलाइन प्रसारित होईल. परीक्षेसारख्या गंभीर विषयावर हसतखेळत चर्चा करूयात.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Edited By - Prashant Patil