Parliament Monsoon Session : मणिपूरचा प्रश्न पेटणार! लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

Parliament Monsoon Session
Parliament Monsoon Sessionesakal
Updated on

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही देखील पाहायला मिळत आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेमध्ये भाष्य करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यानंतर आज काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे, यादरम्यान विरोधकांची आघाडी, भारतीय राष्ट्रीय सर्वसमावेशक आघाडी(INDIA)ने भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Parliament Monsoon Session
Manipur Violence : "वापर करून टाकून दिलं, मारहाणीनंतर भाजप आमदाराच्या पत्नीचा आरोप"; आव्हाडांचं ट्वीट

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची मागणी केली गेली. या मुद्द्यांवर राज्यसभेत सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

Parliament Monsoon Session
Devendra Fadnavis News : शिंदे सरकारचा 'तो' निर्णय रद्द करण्याची फडवणीसांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

पुढे काय होणार?

महत्वाचे म्हणजे मोदी सरकारकडे संसदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला तरी तो फेल होणार हे निश्चित आहे. मोदी सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहे. लोकसभेत मोदींकडे भाजपचे ३०१ खासदार आहेत. तर एनडीएकडे ३३३ खासदारांची संख्या आहे. विरोधकांकडे मात्र एकुण १४२ लोकसभा सदस्य आहेत. त्यापैकी ४० काँग्रेसचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.