Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यानं या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.
Patanjali 14 Products ban in Uttarakhand including Patanjali Drishti Eye Drop
Patanjali 14 Products ban in Uttarakhand including Patanjali Drishti Eye Drop Sakal

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीला उत्तराखंड सरकारनं देखील मोठा झटका दिला आहे. उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागानं कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यानं या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. (Patanjali 14 Products ban in Uttarakhand including Patanjali Drishti Eye Drop)

Patanjali 14 Products ban in Uttarakhand including Patanjali Drishti Eye Drop
Raju Shetti: राजू शेट्टींवर स्वतः गावातील जनता नराज! काय लोकांचं नेमकं म्हणणं? जाणून घ्या

कुठल्या औषधांवर बंदी

पतंजली दिव्य फार्मसीच्या ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

Patanjali 14 Products ban in Uttarakhand including Patanjali Drishti Eye Drop
Govinda Dance: प्रचार की डान्स शो? धैर्यशील माने यांच्या प्रचारात चक्क गोविंदाचे ठुमके!

सुप्रीम कोर्टानं फटकारलं

सुप्रीम कोर्टानं नुकतंच पतंजलीचे मालक बाब रामदेव यांना फटकारलं होतं. रामदेव यांच्याकडून दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातील केल्या जात असल्याचं सांगत कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आरवी अशोकन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. (Marathi Tajya Batmya)

कोविडच्या काळात रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर बेछुट आरोप केले होते. आधुनिक मेडिकल सायन्स हे मूर्ख विज्ञान आहे, असं विधान करुन रामदेव यांनी आधुनिक मेडिकल सायन्सची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Patanjali
PatanjaliSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com