
पाटलीपुत्र बिल्डर्सचे MD अनिल कुमार सिंग यांच्यावर आरोप; ईडीची कारवाई
पाटलीपुत्र बिल्डर्सचे (Patliputra Builders) व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार सिंग (Anil Kumar Singh) यांची ४६.८५ लाख रुपयांची मालमत्ता आज ईडीने (ED) जप्त केली. फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायदा (PMLA Act) २००२ अंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी दोन कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अनिल सिंग यांच्यावर २०१९ पासून मनी लाँड्रिंगचा (Money Laundering Case) खटला सुरू आहे.
अनिल कुमार सिंग यांच्यावर डिसेंबर २०१९ मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. कोतवाली पोलिस स्टेशन आणि आलमगंज पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर आणि आरोपपत्राच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा आज मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, बिल्डर सिंग यांनी तपास यंत्रणेला सहकार्यही केले नाही. तसेच बजावण्यात आलेल्या समन्सकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तपास करण्यात खूप वेळ निघून गेला आहे. त्याच्या विरोधात १ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा: कंगना राणावतच्या 'लॉकअप'मध्ये कैदी बनण्यासाठी स्टार्स घेतात 'इतकी' रक्कम
अनिल कुमार सिंग यांच्यावर कोणते आरोप आहेत
अनिल कुमार सिंग यांनी सर्वसामान्यांची फसवणूक केली.
विविध फ्लॅट खरेदीदारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.
फ्लॅटसाठी मोठी रक्कम घेतली. मात्र फ्लॅट देण्यात आले नाहीत
पैसा हडप करणे, खंडणी वसूल करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अनिल सिंग न्यूज पेपर्स अँड पब्लिकेशन्स लि. पाटलीपुत्र बिल्डर्सच्या कर्मचाऱ्यांच्या ९.४७ कोटी रुपयांचा गंडा घालून त्यांनी मालमत्ताही खरेदी केल्या.
Web Title: Patliputra Builders Md Anil Kumar Singh Money Laundering Case Allegations Ed Action In Patna
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..