Patna News : हिंदू सणांच्या सुटया कमी केल्यावरून वाद; भाजपची नितीशकुमार सरकारवर टीका

बिहार सरकारच्या २०२४च्या सुट्यांच्या प्रस्तावित कॅलेंडरनुसार हिंदू धर्मीयांच्या अनेक सणांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यावरून विरोधी भाजपने नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे.
sushil kumar modi
sushil kumar modisakal

पाटणा - बिहार सरकारच्या २०२४च्या सुट्यांच्या प्रस्तावित कॅलेंडरनुसार हिंदू धर्मीयांच्या अनेक सणांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यावरून विरोधी भाजपने नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षभरात किमान २२० दिवस शाळा सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यानुसार, राज्यातील सरकारी किंवा अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आगामी नवीन वर्षात हे कॅलेंडर पाळावे लागणार आहे. मात्र, हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर सुट्यांच्या या कॅलेंडरचे स्क्रीनशॉट्‌स शेअर केले आहेत. अनेक नेत्यांनी आपला संतापही व्यक्त केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी म्हणाले, की बिहारच्या शिक्षण विभागाचा हा आदेश म्हणजे नितीशकुमार सरकारचा हिंदूंच्या भावनांवरचा हल्ला आहे.

हिंदूंच्या सणांना सुट्या न देण्याचा हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करतील, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, की राम नवमी आणि जन्माष्टमी हे सण प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णासारख्या हिंदूंच्या सर्वाधिक दैवतांशी संबंधित आहेत. या सणांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून दुसरीकडे मुस्लिम सणांच्या सुट्यांमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे.

बिहारचे इस्लामीकरण करण्याचा कट अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आखला जात आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि राज्याचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी केला. राज्यातील सत्ताधारी महागठबंधन सरकारला हिंदू चोख प्रत्युत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुस्लिमबहुल परिसरातील शाळांना शुक्रवारी आठवड्याची सुटी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हिंदू विद्यार्थ्यांना राम नवमी, जन्माष्टमीसह राखी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि अनंत चतुर्दशी हे सण सुटीशिवाय साजरे करावे लागणार आहेत. हिंदूंमध्ये जातींवरून फूट पाडून आपण मुस्लिम तुष्टीकरण करू शकतो, असे नितीशकुमार सरकारला वाटत असावे.

- सुशीलकुमार मोदी, माजी उपमुख्यमंत्री, बिहार

शिक्षण विभागाने पंरपरांचा स्वीकार करायला हवा. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते सुट्यांबाबतच्या आदेशात नक्की सुधारणा करतील. यापूर्वी, त्यांनी अशी सुधारणा केली आहे. भाजप मात्र हिंदू आणि त्यांच्या श्रद्धांचे पेटंट आपल्याकडेच असल्यासारखे वागत आहे.

- अशोक चौधरी, नेते, जेडीयू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com