esakal | IAS अधिकाऱ्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार; राजकारण तापलं
sakal

बोलून बातमी शोधा

IAS अधिकाऱ्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार; बिहारमध्ये राजकारण तापलं

एका आय़एएस अधिकाऱ्याला तक्रार दाखल करण्यासाठी पाच तासांहून अधिक वेळ पोलिस ठाण्यात थांबावं लागलं.

IAS अधिकाऱ्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार; बिहारमध्ये राजकारण तापलं

sakal_logo
By
सूरज यादव

पाटणा - बिहारमध्ये शनिवारी एका आय़एएस अधिकाऱ्याला तक्रार दाखल करण्यासाठी पाच तासांहून अधिक वेळ पोलिस ठाण्यात थांबावं लागलं. तरीही त्याची तक्रा दाखल करून घेण्यात आली नाही. आयएएस सुधीर कुमार हे पाटणातील गर्दनीबाग इथं एससी-एसटी पोलिस ठाण्यात दुपारी कागदपत्रांसह पोहोचले होते. कित्येक तास उभा राहिल्यानंतरदेखील त्यांची तक्रा घेण्यात आली नाही.

पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी एफआय़आारची कॉपी इंग्रजीत लिहिली असल्यानं एफआय़आर दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आयएएस सुधीर कुमार यांना तक्रार न देताच परतावं लागलं. दरम्यान, या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: भारतात 40 कोटी नागरिकांनी घेतली लस

विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी प्रश्न उपस्थित करताना हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, सुधीर कुमार हे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र बिहारमध्ये एफआयआरसुद्धा दाखल होत नाही. बिराहमध्ये सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचेसुद्धा ऐकून घेतले जात नसेल तर सर्वसामान्यांचे कोण ऐकणार. नितिस कुमार कशाला घाबरत आहेत. माझ्यावरसुद्धा FIR दाखल झाला होता. तेव्हा मी कायदेशीर कारवाई करायची असेल ती करा असं म्हटलं होतं.

आयएएस अधिकाऱ्याची तक्रार दाखल न झाल्यानं काँग्रेसनंही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रवक्ते राजेश राठोड यांनी म्हटलं की, कुठलं गुपीत लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर प्रकरण समोर आलं तर अनेक मुख्य सचिव स्तरावरचे अधिकारी तुरुंगात जातील.

हेही वाचा: सहकाराची तत्त्वे पायदळी तुडवू नका; शरद पवारांचा केंद्राला सल्ला

बिहारमध्ये 2017 साली झालेल्या इंटर स्तरावरील पहिल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सुधीर कुमार यांचे नाव आले होते. या प्रकरणात तपासानंतर सुधीर कुमार यांना अटकसुद्धा झाली होती. यानंतर बिहारच्या आयएएस लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

loading image