esakal | 'हा सौदी अरेबिया किंवा इराण नाही, मी बोलणारच'
sakal

बोलून बातमी शोधा

Payal Rohtagi

मी माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यापुढे कायम ठेवणार आहे. कारण, मी सौदी अरेबिया, इराणमध्ये राहत नाही. मी भारतीय आहे. राजस्थान पोलिसांनी मुद्दाम मला लक्ष्य केले.

'हा सौदी अरेबिया किंवा इराण नाही, मी बोलणारच'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नेहरू-गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल कारागृहात जावे लागलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीने जामिनावर बाहेर आल्यानंतर मी सौदी अरेबिया किंवा इराणमध्ये राहत नाही, मी यापुढेही बोलत राहणार असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पायल रोहतगी हिला राजस्थान पोलिसांनी नेहरु-गांधी कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तिला अटक केली होती. न्यायालयाने तिला कोठडी सुनावली होती. अखेर तिला जामीन मिळाल्यानंतर तिने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 

जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पायल म्हणाली, की मी माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यापुढे कायम ठेवणार आहे. कारण, मी सौदी अरेबिया, इराणमध्ये राहत नाही. मी भारतीय आहे. राजस्थान पोलिसांनी मुद्दाम मला लक्ष्य केले. भविष्यात अशाप्रकारे कारागृहात जावे लागणार नाही, याची काळजी मी घेईन.