'भाजपला हरवा, महागाईला हटवा'

डिझेल १०, तर पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त केल्याने लोकांना किती दिलासा मिळेल ?
भाजप
भाजप
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी (ता.तीन) सर्वसामान्यांना थोडासा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. डिझेल १०, तर पेट्रोल पाच रुपयांनी केंद्राने स्वस्त केले आहे. या बरोबरच राज्यांनीही व्हॅट कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजप सरकार असलेल्या (PetrolDieselPrices) राज्यांनी ताबडतोब व्हॅटचे दर घटवले आहे. अद्याप महाराष्ट्राने याबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र आज गुरुवारी (ता.चार) #भाजपा_हराओ_महंगाई_हटाओ हा हॅशटॅग सध्या ट्विटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. १४ हजारांपेक्षा अधिक लोकांनी सदरील हॅशटॅग ट्विट करुन महागाई हटवायचे असेल तर भाजपला हरवा असे आवाहन केले आहे. डाॅक्टर विपीन यादव ट्विटमध्ये म्हणतात, की दिवाळीचे बंपर ऑफर, भाजपला हरवा, स्वस्त पेट्रोल, डिझेल मिळवा. (Inflation)

भाजप
नितीन गडकरी म्हणतात,मोदी सदैव भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव आणि तेलावरील करात कपात म्हणजे भाजपला हरवा, महागाईला हटवा, असे रुचिरा चतुर्वेदी म्हणते.

भारताने सर्व समस्यांवरील उपाय शोधला म्हणजे भाजपला हरवा, महागाईला हटवा, असे रोहन गुप्ता आपल्या ट्विटमध्ये इतरांना आवाहन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com