Manipur Election : उमेदवारांना भेटवस्तू देणारे मतदार, जाणून घ्या काय आहे प्रथा

मणिपूर जरी बाकी राज्याच्या तुलनेत निवडणूकीत कमी चर्चेला असले तरी तेथील निवडणुकीच्या काळातील रोमांचक गोष्टी तितक्याच चर्चेत असतात.
Manipur Election
Manipur Electionटिम ई सकाळ

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर मध्ये निवडणुकीची रंगत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या काळात अनेक रंगतदार गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात. मणिपूर जरी बाकी राज्याच्या तुलनेत निवडणूकीत कमी चर्चेला असले तरी तेथील निवडणुकीच्या काळातील रोमांचक गोष्टी तितक्याच चर्चेत असतात.

तुम्हाला मणिपूरमधील प्रचाराची एक आगळा वेगळा प्रकार माहिती आहे का? इथे ज्योतिषांनी काढलेल्या शुभ मुहूर्तावर प्रचार केला जातो तो पण साधासुधा नाही तर ध्वजारोहन करून. हा कार्यक्रम उमेदवारांच्या घराच्या अंगणात केला जातो तर स्वतः उमेदवार या प्रसंगी पक्षाचा ध्वज फडकवतो. त्यांनतर पुजारी तेथे पूजा करतो आणि उमेदवार मोठ्यांचे, ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतात.

Manipur Election
Ukraine Russia War Live : युक्रेनने लढाई थांबवली की चर्चा करु; रशियाच्या उलट्या बोंबा

अथेनपॉट थिन्बा नावाची प्रथा सुद्धा इथे प्रचलित आहे. ही प्रथा या ध्वजारोहन समारंभाचाच भाग आहे. अथेनपॉट म्हणजे अर्पण करणे होय. या प्रथेत अन्न आणि फुले यासारख्या वस्तूंचा समावेश असतो. मतदारांकडुन मत मिळवण्यासाठी उमेदवार भेटवस्तूचे वाटप करतो, हे आपण सहसा पाहिले पण मणिपुरमध्ये निवडणुकीत उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी त्याला अथेनपॉट दिला. उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी भेटवस्तू देखील दिल्या जातात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com