'लोक पक्षात येत-जात असतात'; कपिल सिब्बलांच्या काँग्रेस सोडण्यावर काय म्हणाले वेणुगोपाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KC Venugopal

काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

'लोक पक्षात येत-जात असतात'; सिब्बलांच्या काँग्रेस सोडण्यावर काय म्हणाले वेणुगोपाल?

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षातून अलिप्त असलेले कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून सपाच्या मदतीनं राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केलीय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांना राज्यसभेची जागा दिलीय. कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिल्याचं सांगितलंय. दरम्यान, कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल (KC Venugopal) म्हणाले की, लोक पक्षात येत-जात असतात. कपिल सिब्बल गेली 30 वर्षे काँग्रेस पक्षात होते. केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये ते अनेकवेळा मंत्रीही राहिले आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

केसी वेणुगोपाल यांनी कपिल सिब्बल यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत दिलेत. यासाठी कोणालाही दोषी धरलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. उदयपूरमधील चिंतन शिबिरानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं पक्षाची पुनर्बांधणी सुरू असल्याचे ते म्हणाले. कपिल सिब्बल यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिलं होतं. पत्रात त्यांनी काँग्रेसच्या मूल्यांवर विश्वास व्यक्त केला होता. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. इथं लोक पक्षात येत-जात असतात. पक्ष सोडून गेलेल्या कुणालाही मी दोष देऊ इच्छित नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, ज्यात जागा कमी नाहीय, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: यासिन मलिक हिटलर मोदींना आव्हान देणारा सर्वात धाडसी व्यक्ती : मुशाल मलिक

काँग्रेसबद्दल मी काहीही बोलणार नाही : कपिल सिब्बल

वेणुगोपाल पुढं म्हणाले, काँग्रेस पक्षाची संपूर्ण पुनर्बांधणी केली जाईल. सर्वसमावेशक पुनर्रचना करून जनतेपर्यंत जाण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षातील प्रत्येक व्यक्तीला संघटनेचं काम मिळालं आहे. याआधी कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्यपदासाठी उमेदवारी केली होती. कपिल सिब्बल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. नामांकनानंतर कपिल सिब्बल म्हणाले, 'मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही. मी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मला काँग्रेसबद्दल काहीही बोलायचं नाहीय. मी अखिलेश यादवजींचा ऋणी आहे.'

Web Title: People Like Kapil Sibal Come And Go In The Congress Party Kc Venugopal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top