अंधश्रद्धेचा कहर! लोकांनी शोधला कोरोनामैय्याच्या पूजनाचा विधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

जगभरात कोरोना रोगावर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भारतात अंधश्रद्धेनं कहर केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाटणा, ता. ६ (वृत्तसंस्था) : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगात जवळपास लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रोगावर औषध आणि लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात भारतात मात्र अंधश्रद्धेनं कहर केला आहे. लोकांनी चक्क कोरोनामैय्याच्या पुजनाचे विधीही शोधून काढले आहेत. बिहारमध्ये अशा पुजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बिहारमध्ये कोरोनाचे देवी म्हणून पूजन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ही अंधश्रद्धा पसरत चालली आहे. महिलांनी तर कोरोनामैय्याच्या पूजनाचे विधीही शोधून काढले असून, सर्व ठिकाणी हे पूजन सुरू झाले आहे. ‘गो कोरोना’च्या घोषणेनंतर ‘कोरोनामैय्या’नेही अंधश्रद्धेची हद्दच ओलांडली आहे.

पाटणाच्या ग्रामीण भागाबरोबरच मुझफ्फरपूर, चंपारण्य, भागलपूर, सुपौल, सहरसा, सीतामढी, शिवहर, समस्तीपूर, आरा, बक्सर, नालंदा जिल्ह्यात महिला मोठ्या संख्येने मंगळवार आणि शुक्रवारी कोरोनामैय्याची पूजा करत आहेत. 

कोरोनाचा कहर थांबता थांबेना! मागील 24 तासांत देशात सर्वाधिक बळींची नोंद

कोरोनामैय्याचा विधीही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोरोनामैय्याला शांत करण्यासाठी एक खड्डा खणला जातो आणि त्यात नऊ लाडू, गुळाचा सरबत, लवंग आणि इलायची टाकून तो बंद केला जातो. असे केल्याने कोरोना शांत होईल, असं या लोकांना वाटतं. विशेष म्हणजे, मंदिरांच्या पुजाऱ्यांनी ही अंधश्रद्धा असल्याचे सांगूनही हा प्रकार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तसेच, त्याला सोशल मीडियावरही त्याला आणखी रंगवून पसरवले जात आहे. आता लोकांनी कोरोनाचही अख्यायिकाही बनविली आहे.

शेतात नांगर अडकला अन् सापडला खजीना...

पाटणातील मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर विनय कुमार म्हणाले, हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे. एका रोगासाठी लढताना अंधश्रद्धा नावाच्या दुसऱ्या एका रोगाची काही जणांना लागण होत आहे. डॉ. सत्यजीत सिंह म्हणाले की, लोक आपल्यातील भीती घालविण्यासाठी हा प्रकार करत असावेत. कोरोना हा आजार आहे आणि तो औषधानेच बरा होऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people superstitions worship of corona virus bihar video viral