esakal | शेतात नांगर अडकला अन् सापडला खजीना...
sakal

बोलून बातमी शोधा

farmer finds pots filled with gold, silver ornaments while tilling his land in telangana

शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत असताना नांगर अडकला. शेतकऱयाने पुन्हा जोर लावला पण पुन्हा अडकला. यानंतर शेतकऱयाने खोदकाम केल्यानंतर मौल्यवान खजीना सापडला. शेतकऱयाने तत्काळ प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. याकूब अली असे शेतकऱयाचे नाव.

शेतात नांगर अडकला अन् सापडला खजीना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद: शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत असताना नांगर अडकला. शेतकऱयाने पुन्हा जोर लावला पण पुन्हा अडकला. यानंतर शेतकऱयाने खोदकाम केल्यानंतर मौल्यवान खजीना सापडला. शेतकऱयाने तत्काळ प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. याकूब अली असे शेतकऱयाचे नाव.

कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

सांगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद येथील येर्रागद्दापल्ली गावात ही घटना घडली. याकूब अली यांना नांगरणी करताना जमिनीतून सोने, मौल्यवान रत्न यासह अन्य दुर्मिळ दागिने, चांदीच्या माळा आणि तांब्याच्या वस्तू सापडल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी खजीना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अन् तिच्या अश्रूंचा फुटला बांध...

याकूब अली यांनी सांगितले की, 'खरिपाच्या हंगामासाठी शेतात नांगरणी सुरू होती. यावेळी नांगराचे फाळके अडकले. पुन्हा जोर लावला, मात्र नांगर पुन्हा अडकला. त्या जागी थोडे खोदकाम करून पाहिले असता धक्काच बसला. सुरुवातीला तिथे तीन कांस्य धातूचे तीन भांडे मिळाले. यात सोने, चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्न होते. तसेच काही तांब्याच्या अँटिक वस्तूही आढळल्या. पण, कशाचाही मोह न धरता याबाबतची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि अधिकारी दाखल झाले.'

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...

दरम्या, याठिकाणी अधिक खोदकाम केले असता सोन्याची 25 नाणी, गळ्यातील अलंकार, अंगठ्या आणि पारंपरिक भांडी मिळाली आहेत. हा सर्व खजीना पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. याची तपासणी करून हे नक्की कोणत्या काळातील आहेत याचा शोध घेतला जाईल. जहिराबाद महाराष्ट्रमधील संभाजीनगर जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. संभाजीनगर निजामाची पहिली राजधानी होती. या भागात अनेक धनाढ्य लोक राहात होते. कोहिनूर हिरा हा गोलकुंडाच्या खाणीत सापडला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात सापडलेला खजीना देखील याच काळातला असावा, अशी शक्यता आहे.

loading image
go to top