NEET Result: अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

NAT: नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे परीक्षेदरम्यान उशीर झाल्यामुळे ग्रेस गुण देणे ही काही विद्यार्थ्यांना “बॅकडोअर एन्ट्री” देण्याची वाईट प्रथा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
NEET
NEETEsakal

NEET परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत NEET चा निकाल रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची एसआयटी चौकशी करावी आणि 4 जून 2024 रोजी निकालावर आधारित समुपदेशन थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांनी ग्रेस गुण देण्यात मनमानी केल्याचा आरोप केला. या संदर्भात, असा युक्तिवाद करण्यात आला की अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले 720 पैकी 718 आणि 719 सारखे उच्च गुण "सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य" आहेत.

विशेष केंद्रातील 67 विद्यार्थ्यांना पूर्ण 720 गुण मिळाले यावरही याचिकाकर्त्यांनी शंका उपस्थित केली. एनटीएने २९ एप्रिल रोजी प्रकाशित केलेल्या अंतिम उत्तर सूचीबाबत अनेक तक्रारी असल्याचेही सांगण्यात आले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे परीक्षेदरम्यान उशीर झाल्यामुळे ग्रेस गुण देणे ही काही विद्यार्थ्यांना “बॅकडोअर एन्ट्री” देण्याची वाईट प्रथा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

NEET
AAP Delhi Office : सुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा! मुख्यालय रिकामे करण्यास दिला दहा ऑगस्टपर्यंत वेळ

सध्याची याचिका अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि डॉ. शेख रोशन मोहिद्दीन, मूळचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांनी दाखल केली होती. याचिकाकर्ते स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आहेत.

लखनऊमधील एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तिने आरोप केला आहे की, निकालाच्या दिवशी तिला एनटीएकडून एक मेल आला होता ज्यामध्ये लिहिले होते की तिची ओएमआर शीट फाटली आहे ज्यामुळे तिचा निकाल तयार होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आयुषी पटेलने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे की, तिची ओएमआर शीट कोणीतरी जाणूनबुजून फाडली आहे.

NEET
Jammu Bus Terror Attack: दहशतवादी हल्ल्याची ‘एनएआय’कडून होणार चौकशी; पथक रियासी येथे दाखल

परीक्षेतील अनियमिततेबाबत देशभरात निदर्शने

दिल्ली, भोपाळ, वाराणसीसह देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी NEET UG मधील अनियमिततेविरोधात तीव्र निषेध केला. NEET UG परीक्षा रद्द करावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे दिल्लीतील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com