भारतातील 'या' शहरात आज पेट्रोल ८४.१० प्रतिलिटर, तर परभणीत सर्वात महाग

petrol price
petrol pricegoogle

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनेक राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये काहीसा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले. मात्र या दर कपातीचा परभणी जिल्ह्याला फारसा फायदा झालेला नसून महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल येथे मिळत आहे. त्याचवेळी देशातील एका शहरात आज पेट्रोलचे दर सर्वात कमी ८४.१० रुपये प्रतिलिटर आहे. (petrol-diesel rate news in Marathi)

petrol price
Fadanvis: मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलतो असं म्हणताच CM शिंदे गालात हसले...

पेट्रोल-डिझेलचे दरांबाबत आजचा 61वा दिलासा देणारा ठरला. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 106 ते 107 डॉलरच्या दरम्यान आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये सलग ६१ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

petrol price
SC चा 'सर्वोच्च' निर्णय; अविविहित महिलांना गर्भपात करण्यापासून रोखता येणार नाही

दरम्यान पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल मराठवाड्यातील परभणीत मिळत आहे. येथे पेट्रोलचे दर १०९.३० आणि डिझेल ९५.७७ प्रतिलिटर आहे.

महानगरांमध्ये इंधन दर

दिल्ली

पेट्रोल - रु. 96.72

डिझेल - रु 89.62

मुंबई

पेट्रोल - रु. 106.31

डिझेल - रु. 94.27

चेन्नई

पेट्रोल - रु. 102.63

डिझेल - रु. 94.24

कोलकाता

पेट्रोल - रु. 106.03

डिझेल - रु. 92.76

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com