esakal | भाजपशासित या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली 5 रुपयांची कपात, दारुही स्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

petrol main.jpg

पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच शंभरी गाठतील. यामुळे नागरिकांमध्येही असंतोषाची भावना निर्माण होत आहे.

भाजपशासित या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली 5 रुपयांची कपात, दारुही स्वस्त

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- इंधनाचे दर दररोज वाढत असल्यामुळे देशभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच शंभरी गाठतील. यामुळे नागरिकांमध्येही असंतोषाची भावना निर्माण होत आहे. याचदरम्यान, आसामने मात्र राज्यातील नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. आसाम सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात 5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दारुवरील कर 25 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. शुक्रवारी (दि.12) मध्यरात्रीपासून नवे दर लागू केले जाणार आहेत. देशभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आसामच्या नागरिकांना मात्र हा मोठा दिलासा आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपया नजीक पोहोचले आहेत. 

राज्याचे अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यात मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. 2016 मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत येणारी भाजप सरकार पुन्हा एकदा सीमावर्ती राज्यात सत्तेत येण्याची तयारी करत आहे. पश्चिम बंगाल, आसामसमवेत 5 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. बांगलादेश घुसखोरांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या आसामला भाजपसाठी पूर्वोत्तर राज्यांचे प्रवेशद्वार म्हटले जाते. भाजपने आता त्रिपुरा पासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत अनेक पूर्वोत्तर राज्यांमध्ये सत्ता काबिज केली आहे. 

हेही वाचा- ममतांच्या 'हम्बा हम्बा, रम्बा रम्बा'वर भन्नाट मीम्स; व्हायरल व्हिडीओत का म्हणाल्या असं?

हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, या निर्णयामुळे राज्य सरकारला दर महिन्याला 80 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. जेव्हा कोरोनाचे संकट आपल्या सर्वोच्च पातळीवर होते. तेव्हा आम्ही पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्समध्ये वाढ केली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आरोग्याच्या क्षेत्रावरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने कर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर गुजरातनंतर आसाम देशातील सर्वांत स्वस्त दरात पेट्रोल विकणारे राज्य असेल. त्याचबरोबर डिझेलबाबत बोलायचे म्हटले तर हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशनंतर आसाम चौथ्या नंबरवर असेल. 

हेही वाचा- '...पाठ दाखवून गेले सज्जन'; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर तिखट पलटवार, पाहा व्हिडिओ

loading image