रशिया-युक्रेन युद्धाचा फटका कच्च्या तेलावर! पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार वाढ ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crude Oil

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका कच्च्या तेलावर! पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार वाढ ?

रशिया- युक्रेनच्या युद्धाचा सध्या महागाईवर फटका बसण्याची दाट शक्यता आहे. याआधीच कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत वाढ झाली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरु झाल्याने कच्चं तेल आणखी महाग होऊ शकतं.

आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष कच्च्या तेलाच्या किमतीवर लक्ष ठेवत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये प्रति बॅरल 125 डॉलर आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त त्यांनी व्यक्त केलाय. डिसेंबर 2021 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती तर आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर कच्च्या तेलाची किंमत आहे. दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीने 40 टक्क्यांचा उच्चांक गाठलाय.

हेही वाचा: राज्यातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

खर तर सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका (Election) सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी देशात पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात कुठलाही बदल होणार नाही. मात्र निवडणुका झाल्यानंतर देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Petrol Diesel Prices Likely To Hike Crude Oil Price Touches 100 Dollar Per Barrel Just Due To Russia Ukraine Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top