'मोदी सरकार देत आहे 50000 रुपये?'

वृत्तसंस्था
Wednesday, 30 September 2020

सरकारकडून 'पंतप्रधान बालिका अनुदान योजने'अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली: सरकारकडून 'पंतप्रधान बालिका अनुदान योजने'अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा मेसेज खोटा असून, सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचा खुलासा भारत सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्यूरोने (पीआयबी) केला आहे.

माता तू न वैरिणी; बाळाला भोकसून मारले

पंतप्रधान योजनांच्या नावाखाली अनेक फसवणूक करणाऱ्या घटना समोर येत आहेत. काही बनावट योजना दाखवून सामान्यांची फसवणूक केली जाते आहे. लॉकडाऊन काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सामान्य जनतेला फसवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर विश्वास ठेवून फसवणूकीच्या जाळ्यात अडकतात. सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, 'सरकारकडून 'पंतप्रधान बालिका अनुदान योजने'अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.' पण, व्हायरल होणारी ही पोस्ट पूर्णपणे बनावट आहे. केंद्र सरकारद्वारे अशी कोणतीच योजना राबवली जात नाही आहे, असा खुलासा पीआयबीने ट्विटरवरून केला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने त्यांच्या ट्विटर हँडलवर असे लिहिले आहे की, 'एका वेबसाइटवर असा दावा केला जात आहे केंद्रसरकार 'दावा- पंतप्रधान बालिका योजने'अंतर्गंत बीपीएल श्रेणीतील कुटुंबांना मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांची मदत करणार आहे. PIBFactCheck- हा दावा खोटा आहे. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pib fact check government giving 50000 rs to bpl families for daughter wedding