
इंडोनेशियातील स्थानिक प्राणी असलेल्या रानडुकराचे हे चित्र दक्षिण सुलावेसी खोऱ्यात सापडले. यासंबधीचा शोधनिबंध ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालितामध्ये प्रसिद्ध झाला.
नवी दिल्ली - आशिया खंडात मानवाच्या कलेचा सर्वांत जुना पुरावा इंडोनेशियात आढळला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना जगातील सर्वांत जुने गुंफाचित्र सापडले आहे. रानडुकराचे हे चित्र ४५ हजार ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इंडोनेशियातील स्थानिक प्राणी असलेल्या रानडुकराचे हे चित्र दक्षिण सुलावेसी खोऱ्यात सापडले. यासंबधीचा शोधनिबंध ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालितामध्ये प्रसिद्ध झाला. ‘‘लिआंग टेडोन्गंग येथील चुनखडीची गुहेत सुलावेसीतील रानडुकराचे चित्र सापडले आहे. हा जगातील सर्वांत प्राचीन कलाविष्कार आहे,’’ अशी माहिती ऑस्ट्रेलियातील ग्रीफिथ विद्यापीठातील ॲडम ब्रूम यांनी दिली. या गुहेच्या बाजूने चुनखडीचे उंच कडे आहेत. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे येथे पोचणे अशक्य असते. केवळ कोरड्या हवामानात चिंचोळ्या वाटेने गुहेत जाता येते. जगापासून अलग पडलेल्या बुगीस समुदायाचे अस्तित्व या खोऱ्यात असून आतापर्यंत एकही पाश्चिमात्य व्यक्ती तेथे पोचू शकलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रानडुकराचे हे चित्र कातळ शिल्पकलेचा एक भाग आहे. इंडोनेशियाचे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ग्रीफिथ विद्यापीठातील पीएच.डी.चे विद्यार्थी बसरान बुऱ्हान यांच्या नेतृत्वाखालील पथकाला लिआंग टेडोन्गंग गुहेची पाहणी करताना त्यांना हे चित्र दिसले. यात चार रानडुकरे चितारलेली आहेत. यातील एक अगदी स्पष्ट दिसत आहे. रानडुक्कर अन्य जनावरांकडे पाहत असल्याचे दिसत आहे. यापूर्वीचे सर्वांत जुने कातळशिल्प ‘सिन’ हे असून ते ४३ हजार ९०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. त्यावर सुलावेसी रानडुकराची शिकार करणारी प्राणी व मानवाचे शरीर असलेली मिश्र आकृती आहे. चुनखडीच्या गुहेच्या परिसरात हे चित्रही याच पथकाला आढळले होते.
‘डिएन’ नमुने
या चित्राच्या वरील भागात दोन हातांचे चिन्ह आहे. यातून ‘डिएन’ नमुने मिळण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. हे चित्र तयार करणारी व्यक्ती ‘होमो सेपियन्स’ गटातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता लुप्त झालेल्या ‘डेनिसोव्हन’ या जातीतील हे मानव असल्याचा एक मतप्रवाह आहे.
हे वाचा - अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई
रानडुकराचे हे चित्र ज्यांनी रेखाटले आहे, ते अत्यंत आधुनिक असल्याचे लक्षात येते. त्यांकडे अशी चित्र निर्मिती करण्यासाठी आवश्यक हत्यारे आणि विचारक्षमता होती
- मॅक्सिम आयुबर्ट, प्राध्यापक, र्ग्रीफिथ विद्यापीठ
रानडुकराला महत्त्व
बुऱ्हान म्हणाले की, सुलावेसी रानडुकरांची शिकार करण्याची पद्धत हजारो वर्षांपूर्वी होती. हिमयुगीन काळात इंडोनेशियातील काताळशिल्पांत रानडुकरांचे चित्र मोठ्या प्रमाणावर रंगवले जात असे. रानडुकराचा समावेश येथील अन्नात होत असे. तसेच सर्जनशील विचार आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या दृष्टीनेही रानडुकराला महत्त्व होते.