Pink Potatos : कृषी संशोधकांची कमाल! गुलाबी सोनं पिकवून ८० दिवसातच शेतकरी होणार मालामाल

आता शेतात लावा भरमसाठ फायदे असलेला गुलाबी बटाटा
pink potato
pink potatoesakal

बटाटा अनेक लोकांचा फेवरेट आहे. कारण, बटाट्यापासून आपण अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकतो. त्यामूळे शेतकऱ्यांकडील बटाट्याला चांगला भाव मिळतो. पण, काहीवेळा कमी हमीभाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील बटाटा तसाच बाद होऊन जातो. शेतकऱ्याला त्याचे नुकसान भरपाईही मिळत नाही.

शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणारे एक पिक संशोधकांनी शोधून काढले आहे. तूम्ही बीट, गाजर लाल गुलाबी रंगाचे पाहिले असेल. पण, कृषी संशोधकांनी आता गुलाबी रंगाचा बटाटा शोधून काढला आहे. शेतकऱ्याने हा गुलाबी बटाटा शेतात लावला तर त्यांना फायदाच फायदा होईल असा दावाही संशोधकांनी केला आहे.  

pink potato
Farmers Long March : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट?

बटाटा ही एक अशी भाजी आहे जी सहसा प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात वापरली जाते. त्यामुळे शेतकरी त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करतात. बटाट्यामध्ये पोषक तत्वांचा साठा आहे ज्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत शरीराला संपूर्ण पोषण मिळते.

pink potato
Farmers Long March : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट?

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील हलसी ब्लॉकमध्ये असलेल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या बटाट्याचा शोध लावण्यात आला आहे. बटाट्याच्या या प्रजातीला युसीमॅप आणि बडी आलू ७२ असे नाव देण्यात आले आहे. लवकरच बटाट्याची ही जात शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचणार आहे. ज्याचे उत्पादन करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.

pink potato
Ideal Farmer : विविध योजनांमुळे मल्हार कुंभार बनले आदर्श शेतकरी...

गुलाबी बटाटा का आहे खास

हा बटाटा सामान्य बटाट्यापेक्षा अधिक पौष्टिक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तर, सामान्य बटाट्यापेक्षा कार्बोहायड्रेट आणि स्ट्रेचचे प्रमाण सामान्य बटाट्यापेक्षा कमी आहे. जे लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.

या बटाट्याची साठवण क्षमता अधिक आहे. सामान्य बटाट्याच्या तुलनेत तो अधिक काळ टिकू शकतो.  या प्रजातीचा बटाटा कुजत नाही. त्यामुळे गुलाबी बटाटा अनेक महिने सहज साठवता येते.

pink potato
Sahyadri Farms : दगडूशेठ गणपतीला येत्या संकष्टीला सह्याद्री फार्म्सतर्फे द्राक्षांची आरास!

डोंगराळ भागातही शेतकरी गुलाबी बटाट्याची शेती मोठ्या प्रमाणावर करतात. या बटाट्याचे सामान्य पीक साधारणपणे ९० ते १०५ दिवसांत तयार होते. त्यामूळे ते अधिक वेळखाऊ असते. याऊलट गुलाबी बटाटा केवळ 80 दिवसांतच पूर्णपणे तयार होतो. त्यानंतर त्याचे उत्पादन हेक्टरी 400 क्विंटलपर्यंत होते.

pink potato
कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात शेतकऱ्याची फसवणूक! सूर्यफूल बियाणे उगवलेच नाही | Fraud with Farmer

गुलाबी बटाटा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

शास्त्रज्ञांच्या मते, शेतकऱ्यांसाठी हा बटाटा फायदेशीर ठरेल. कारण, या गुलाबी बटाट्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्यामुळेच बटाट्यावर रोग पडत नाही. रोग नसल्याने शेतकऱ्याचे नुकसानही होत नाही आणि औषध फवारणीवर होणारा खर्चही कमी होतो. औषध फवारणी नसल्याने लोकांना सेंद्रीय पद्धतीने जगवलेला बटाटा खायला मिळतो. त्यामूळे लोकही तो जास्त प्रमाणात खरेदी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com