

Patiala Pitbull Attack Video Goes Viral After Couple Is Attacked
Esakal
पंजाबच्या पटियाला इथं एका घरात पाळलेल्या पिटबुल डॉगने पती पत्नीवर अचानक हल्ला केल्याची घटना घडलीय. एक ते दीड मिनिटापर्यंत कुत्र्याने २५ पेक्षा जास्त वेळा पती पत्नीला चावा घेतला. यात महिलेच्या हाताला तर पतीच्या पायाला चावा घेतल्याचं दिसून येतंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबमध्ये घर पाहण्यासाठी गेटवर उभा राहिलेल्या पती-पत्नीवर पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केला.