‘आनंददायी शिक्षणा’चे विदेशात आकर्षण

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या देशाचे भवितव्य आहे. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मूल्यशिक्षण आणि त्याचा आत्मविश्‍वास महत्त्वाचा असतो.

नवी दिल्ली - शिक्षणातून मूल्यशिक्षण आणि मूल्यशिक्षणातून मानवी जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या दिल्लीतील केजरीवाल सरकारची आनंददायी शिक्षण पद्धत तब्बल १३ देशांना आकर्षित करत आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीसह अनेक विद्यापीठांनीही या पॅटर्नची आपल्यालाही गरज असल्याचे स्पष्ट केल्याने हा पॅटर्न येत्या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व सरकारी शाळांमध्ये मागील दोन वर्षांपासून आनंददायी शिक्षणाचा पॅटर्न राबवला जात आहे. मागील वर्षभरात एक हजार ३० शाळांमधील तब्बल आठ लाख मुलांना या आनंददायी अभ्यासक्रमाच्या पॅटर्नमधून शिक्षण दिले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम शाळाच नाही तर विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचल्याची माहिती दिल्लीच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संचालक (डीआयईटी) प्रा. अनिलकुमार तेवतिया यांनी दिली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यात कुठेही धर्म, जाती, पंथ, भेद, पौराणिक, काल्पनिक कथा, धार्मिक आदी कथांना स्थान नाही. या सर्वांच्या पलीकडे जाऊन यामध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली आणि मानवीमूल्यांचा विकास होऊन जगण्यासाठी जीवनमूल्ये किती महत्त्वाची आहेत यावर भर दिला जात आहे. या शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. सभाधीटपणा आणि विद्यार्थ्यांची आकलन क्षमता अधिक वाढविण्यावर भर दिला जातो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या देशाचे भवितव्य आहे. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मूल्यशिक्षण आणि त्याचा आत्मविश्‍वास महत्त्वाचा असतो. तोच आम्ही आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना देत आहोत. यातून एक नवीन पद्धत आम्ही विकसित केली आहे.
- मनीष सिसोदिया, शिक्षणमंत्री, दिल्ली

अशी आहे पद्धत
वर्गनिहाय आठवड्याचे वेळापत्रक निश्‍चत केले जाते
एखाद्या विषयावर विद्यार्थ्यांचे मत घेऊन चर्चा घडविल्या जातात 
कोणत्याही प्रकारची सक्ती विद्यार्थ्यांवर नसते
आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात ध्यान प्रक्रियेने 
नातेसंबंधाचा विचार, शिक्षक-विद्यार्थी संबंध शिक्षणाचे मूल्य यासह चर्चा

भारत

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pleasing education system of the Kejriwal government in Delhi is attracting countries