Coronavirus : सचिन, विराट, सायनासह ४० क्रीडापटूंसोबत मोदींची बैठक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हिटमॅन रोहित शर्मा, हिमा दास, पीव्ही सिंधू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हिटमॅन रोहित शर्मा, हिमा दास, पीव्ही सिंधू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्रवारी सकाळी ९ वाजता मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांनी देशातील ४० लोकप्रिय क्रीडापटूंची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेशी आज तिसऱ्यांदा संवाद साधला. त्यानंतर मोदी यांनी पहिल्यांदाच देशातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधला.

तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा यांच्यासह पी. टी. उषा, पुलेला गोपीचंद, विश्वनाथन आनंद, हिमा दास, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू या नामांकित क्रीडापटूंशी चर्चा केली. या बैठकी दरम्यान कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांनी क्रीडाविश्वाची साथ मागितली आणि त्यांच्याशी करोनाच्या प्रभावाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM holds meeting with 40 elite sportspersons including Virat Sachin Sourav