शेतकऱ्यांनाही मिळणार प्रत्येक महिन्याला पेन्शन; जाणून घ्या फायद्याची योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 13 January 2021

शेतकऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकते. यासाठी केंद्र सरकारची एक खास योजना आहे. 

नवी दिल्ली- नोकरी करणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते, त्यामुळे त्यांना काही अडचणी येत नाहीत. शेतकऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकते. यासाठी केंद्र सरकारची एक खास योजना आहे. 

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. त्यातलीच एक आहे, पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्ष झाल्यानंतर पेन्शन मिळू लागते. 18 ते 40 वर्ष वयाचा कोणताही शेतकरी महिन्याला काही रक्कम भरुन वयाच्या साठीनंतर 3 हजार रुपये महिना किंवा वार्षिक 36000 पेन्शन मिळवू शकतो. या योजनेला भारतीय जीवन विमा निगमद्वारे लागू केले जात आहे. आतापर्यंत 21 लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. जाणून घेऊया काय आहे योजना...

अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला...

काय आहे योजना?

किसान पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्ष वय असणारे शेतकरी भाग घेऊ शकतात, ज्यांच्याकडे कमाल 2 हेक्टर जमीन आहे. 20 वर्ष ते जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत 200 रुपये महिना किंवा 2400 रुपये वार्षिक अंशदान करावं लागेल. अंशदान शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ 18 व्या वर्षी या योजनेशी जोडले गेले असल्यास महिन्याला 55 रुपये द्यावे लागतील, तसेच सरकार 55 रुपयांचे योगदान आपल्या खात्यात देईल. 

रेजिस्ट्रेशन कसे कराल

शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन आपलं रेजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड आणि सातबाऱ्याची कॉपी घेऊन जावी लागेल. सोबत 2 पासपोर्ट साईझ फोटो आणि बँकेचे पासबूक द्यावे लागेल. शेतकऱ्याला रेजिस्ट्रेशनसाठी कोणतीहे अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही. रेजिस्ट्रेशनदरम्यान शेतकरी पेन्शन यूनिक नंबर आणि पेन्शन कार्ड बनवलं जाईल. 

महाराष्ट्र राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने घेतला आखडता हात

अंशदान भरणं सोडून दिल्यास काय होईल?

जर एखादा शेतकरी अंशदान भरण्यास असमर्थ असेल किंना अन्य कारणामुळे योजना सोडू इच्छित असेल तरु तुमचे पैसे बुडणार नाहीत. योजना सोडताना जितके पैसे जमा झाले आहेत, त्यावर बँक सेविंग अकाऊंटवर देणारे व्याज जमा होईल. शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहिल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Kisan Maan Dhan Scheme farmers will gate pension every month