

PM Modi Announces ‘Shakti Ki Saptadhara’ From Red Fort
Esakal
भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन आज उत्साहात साजरा होत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना शक्ती की सप्तधाराचं आवाहन केलंय. तरुणांना मोठ्या बदलासाठी पुढे येण्याचं आणि देशाला विकसित बनवण्यात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता थाबंण्याची वेळ नाही. आपण आपला विचार, काम करण्याची पद्धत आणि कामाचा वेग बदलावा लागेल. जे काम गेल्या ५० वर्षात झालं नाही ते येत्या ५-७ वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य असेल.